Tuesday, November 8, 2011

सुख दु:ख

माणसाच्या जिवनात दु:ख आणि सुखाचं असंच असतं... माणूस जसं जसं आपल्या जिवनातील दु:खाला दूर सारण्याचा प्रयत्न करतो...त्यावेळेपुरतं वाटतं की आता दु:ख पुन्हा कधीच येणार नाही... पण दु:खाचं त्या वस्तूसारखं असतं... जितकं तुम्ही त्याला दुर फेकण्याचा प्रयत्न करणार ते पुन्हा तेवढ्याच जोराने किनाऱ्यावर येणार... आता बघ तो मुलगा थोड्या वेळाने आपल्या खेळण्यात गुंग होईल ... आणि त्या वस्तूला तो पुर्णपणे विसरुन जाईल ..मग जेव्हा त्याला त्या वस्तूची आठवण येईल... ती वस्तू त्याला किनाऱ्यावर शोधून सुध्दा सापडणार नाही ... तसंच माणसाने दु:खामधे न गुरफटता ... सुख दु:खांना स्थितप्रज्ञतेने जर तोंड दिलं तर त्याला त्या दु:खाचा त्रास होणार नाही ...देअर विल बी पेन बट टू सफर ऑर नॉट टू सफर वील बी अप टू यू!''

No comments:

Post a Comment